संतोष जाधवला मिळाले साडेतीन लाख; मुसेवालाच्या हत्येसाठी आठ शार्प शूटर्सना सुपारी | पुढारी

संतोष जाधवला मिळाले साडेतीन लाख; मुसेवालाच्या हत्येसाठी आठ शार्प शूटर्सना सुपारी

पुणे : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात एकूण 8 शार्प शूटर्सना सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील शार्प शूटर संतोष जाधव याला या प्रकरणात साडेतीन लाख रुपये मिळाल्याचे पोलिस तपासात समोर आहे. हे पैसे नवनाथ सूर्यवंशीला मिळाले असून, त्या पैशांचा पोलिस शोध घेत आहेत. सूर्यवंशी ज्या साडेतीन लाख रुपयांचा उल्लेख करतो ते पैसे मुसेवाला हत्या प्रकरणात शार्प शूटरांना दिलेल्या पैशांपैकी आहेत. याबाबत नवनाथ सूर्यवंशीकडे ग्रामीण पोलिस चौकशी करीत आहेत.

मात्र, नवनाथ याने हे पैसे कोणत्या खात्यात जमा केले अथवा कोठे ठेवले आहेत याची काहीही माहिती अजून पोलिसांना दिलेली नाही. मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिस लॉरेन्स बिष्णोई याच्याकडे तपास करत असून, काही संशयितांना पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष जाधव याला आपण ओळखत असल्याची लॉरेन्स याने कबुलीदेखील पोलिसांना दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून संतोष जाधव व नवनाथ सूर्यवंशी यांना 12 जून रोजी अटक केली होती. त्यांच्याकडे पंजाब पोलिस व हरियाणा पोलिसांनी कसून चौकशी केली.

Ketaki Chitale : केतकी चितळेचा जामीन मंजूर

मुंबई पोलिसांनीही दोघांकडे तसेच महाकाल याच्याकडे चौकशी केली आहे. हत्येनंतर 1 जून रोजी नवनाथ सूर्यवंशी याचा सिद्धेश महाकाल याला सिग्नल अ‍ॅपवर कॉल आला होता. त्याने काम झाले आहे. साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत. सेफ झाल्यावर, तू मला कॉल कर, असे सांगितले. त्यासाठी त्याने सिद्धेश याला एक मोबाईल नंबर दिला. तो मोबाईल नंबर सिद्धेश याने जय हो या नावाने सेव्ह केला होता. त्यावेळी नवनाथ सूर्यवंशी सिद्धेशला म्हणाला की, तू मला अकाउंट नंबर दे, मग मी तुला पैसे पाठवेल.

त्यावेळी सिद्धेश याने त्याला विचारले की, तुम्ही कोठे आहे? तेव्हा त्याने सांगितले की, मी गुजरातला आहे व संतोष पण तिकडे येणार आहे. मुसेवाला हत्येच्या वेळी आपण गुजरातला होतो, असा संतोषने दावा केला. मात्र, या संभाषणानुसार संतोष तेव्हा गुजरातला आला नव्हता, असे आढळून येत आहे. त्याचाही पोलिस शोध घेत आहेत.

महाकालकडून मिळाली माहिती
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येसाठी आठ शार्प शूटर्सना सांगण्यात आले होते. या सर्वांना प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिल्याचे पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासात महाकाल याने याबाबतची माहिती दिली.

हेही वाचा

पुणे शहरात नव्या विषाणूंचे आणखी पाच रुग्ण

चित्रपट महामंडळ अध्यक्षपदी सुशांत शेलार

उद्यानांची नावे बदलणार विधी विभागाच्या अभिप्रायाने अधिकार्‍यांसमोर पेच

Back to top button