जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण आवश्यक | पुढारी

जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण आवश्यक

बारामती : पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या आरोग्यासाठी माती परीक्षण करण्याचा सल्ला कृषिकन्यांनी झारगडवाडी (ता. बारामती) येथील शेतकर्‍यांना दिला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न बारामतीतील डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून झारगडवाडीतील शेतकर्‍यांना माती परीक्षणाबाबत मार्गदर्शन केले गेले.

या वेळी गावातील अनेक प्रगतशील शेतकर्‍यांनी व ग्रामस्थांनी हजेरी लावली. यादरम्यान कृषिकन्या धनश्री कुदळे, रचना कोल्हे, वैष्णवी खंडागळे, अक्षदा कदम, अमृता कदम, ऐशवर्या भंडारे, अनिशा लोहकरे यांनी माती परीक्षण व मातीच्या आरोग्याबाबत माहिती शेतकर्‍यांना दिली.

माती नमुना संकलनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या वेळी सुनील सपकाळ, राजाराम राऊत, विठ्ठल आवटे, तानाजी दळवी आदी शेतकरी उपस्थित होते. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, पालाश, स्फुरद, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू इत्यादीची माहिती मिळते, असे कृषिकन्यांनी सांगितले.

Back to top button