पुणे : ख्वाजा शाह मन्सूरबाबा दर्ग्याचा उद्यापासून उरूस | पुढारी

पुणे : ख्वाजा शाह मन्सूरबाबा दर्ग्याचा उद्यापासून उरूस

सुपे : पुढारी वृत्तसेवा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारा व नवसाला पावणारा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ख्याती असलेला बारामती तालुक्यातील सुपे येथील ख्वाजा शाह मन्सूरबाबा दर्ग्याच्या उरसास गुरुवार (दि. 16) पासून प्रारंभ होत आहे.

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

गुरुवारी संदल असून, या दिवशी शाहीस्नान (देवाला पाणी घालण्याचा) कार्यक्रम असतो. ”कोहया” या विहिरीवरून सकाळी 10 वाजता फकिरांच्या उपस्थितीत वाद्यांच्या निनादात मंत्रोच्चारित पाणी आणून बाबांच्या समाधीला स्नान घातले जाते. रात्री 9 वाजेच्या दरम्यान पिराच्या गलबाची मिरवणूक काढण्यात येते. या दिवशीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रात्री 10 वाजता फकिरांच्या जरब टोचण्याचा कार्यक्रम असतो. अंगावर लोखंडी धारदार सळई टोचण्याचा, तलवार मारून घेण्याचा चित्तथरारक कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होते. पहाटे बाबांच्या समाधीवर गलब चढविण्याचा मान कासार समाजास असतो.

COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

शुक्रवारी (दि. 17) उरसाचा मुख्य दिवस असून सायंकाळी सुपे गाव व परिसरातील सर्व जाती-धर्माचे लोक एकत्रित येऊन गव्हाच्या पिठाचे दिवे पाजळून नवस फेडतात, तसेच गुळाची शेरणी वाटली जाते. रात्री 9 वाजता लता-लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. 18) रात्री 9 वाजेच्या दरम्यान सर्फराज साबरी (राजस्थान), आफताब कादरी (इंदूर) यांच्या कव्वालीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी सायंकाळी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात येतो.

Suicide : नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारीकेची आत्महत्या

रविवारी (दि. 19) दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठण करून कुराण वाचनाचा धार्मिक विधी होतो. यावेळी अल्लामा व मौलाना अहमद नक्शबंदी (हैदराबाद) हे प्रवचन देणार आहेत. जियारत कार्यक्रम होऊन लंगर (भंडारा) होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. चार दिवस चालणार्‍या या उरसाच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन शाह मन्सूर दर्गाह ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, दर्ग्याची रंगरंगोटी करण्यात आली असून, दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली असून, लाईट व्यवस्था करण्यात आली आहे. खांबावरील गेलेले दिवे बसविण्यात आले आहेत.

Back to top button