कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर | पुढारी

कोल्‍हापूर : डॉ. जनार्दन वाघमारे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर

कोल्‍हापूर, पुढारी वृत्‍तसेवा : यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ डॉ. जनार्दन वाघमारे यांना देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू मेमेरियल ट्रस्टच्या वतीने १९८४ पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

१ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शाहू जयंती दिवशी म्हणजे २६ जूनला या पुरस्कारचे वितरण होणार आहे. शाहू मेमोरियल ट्रस्टचे सचिव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. वाघमारे १९७७ला लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य झाल्यानंतर अनेक शैक्षणिक उपक्रम राबवले. तसेच स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे.

२००८ ते २०१४ या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी आतापर्यंत ४७ पुस्तके लिहिली आहेत. त्यात निग्रो साहित्य आणि संस्कृती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारक विचार, डॉ. आंबेडकर आणि जातीय अंताचा लढा ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. पंजाब विद्यापीठाने त्यांना डि.लीट ही पदवीही दिली आहे. वाघमारे यांना आतापर्यंत २५ विविध पुरस्कार मिळाले आहेत.

२०२० चा राजर्षी शाहू पुरस्कार डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला होता, पण कोरोनामुळे पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते. याच कार्यक्रमात डॉ. तात्याराव लहाने यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

हेही वाचा  

Back to top button