Latest
Suicide : नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारीकेची आत्महत्या
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारीका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी परिचारीकेने बुधवारी (दि. 15) गळफास घेतल्याचे आढळून आले.
माधुरी काशिनाथ टोपले (19) रां. वागण सुळे, ता. सुरगाणा असे या प्रशिक्षणार्थी परीचारिकेचे नाव आहे. माधुरी हिने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे सकाळी आढळून आले. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.

