COVID19 | देशातील कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरु; २४ तासांत ८,८२२ नवे रुग्ण, १५ मृत्यू

covid19 Updates
covid19 Updates

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत काल मंगळवारी घट झाली होती. पण आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८,८२२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्या ५३,६३७ वर पोहोचली आहे. बुधवारचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट २ टक्के एवढा आहे. दिवसभरात ५,७१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात आतापर्यंत १९५ कोटी, ५० लाख ८७ हजार २७१ कोटी डोस देण्यात आले आहेत. गेल्या एका दिवसांत १३ लाख ५८ हजार ६०७ डोस देण्यात आले आहेत.

याआधीच्या दिवशी देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली होती. सोमवारी दिवसभरात ६ हजार ५९४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४ हजार ३५ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. मंगळवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६७ टक्क्यांपर्यंत घसरला होता. तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.०५ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर २.३२ टक्के नोंदवण्यात आला. रविवारी ८ हजार ८४ कोरोनाबाधित आढळले होते.

मुंबईत कोरोनाने दोघांचा मृत्यू; १,७२४ नवे रुग्ण

मुंबईत मंगळवारी तब्बल १ हजार ७२४ नव्या रुग्णांची भर पडली आणि ७५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले, तर दोघांचा मृत्यू झाला. मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आता ११ हजार ८१३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना (COVID19) रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ८ हजार ८६६ जणांचा शोध घेण्यात आला. मात्र अवघ्या ११ हजार ६५ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्या कमी होऊनही रुग्ण वाढत आहेत.

बी.ए. व्हेरियंटचे राज्यात 38 रुग्ण राज्यात बी. ए. व्हेरियंटचे आतापर्यंत ३८ रुग्ण आढळले असून, मुंबईपाठोपाठ आता ठाण्यातही बी.ए. व्हेरियंटचे २ रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये मंगळवारी कोरोनाच्या दोन हजार ९५६ नवीन रुग्णांची भर पडली. त्यात ठाण्यातील दोघांना बी.ए. व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news