पुणे शहरात दिवसभरात 124 कोरोनाबाधित; तपासणी केंद्रही वाढणार | पुढारी

पुणे शहरात दिवसभरात 124 कोरोनाबाधित; तपासणी केंद्रही वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, 8 जून रोजी दिवसभरात 124 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 516 इतकी झाली असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तपासणी सेंटरची संख्या 8 वरून पूर्वीप्रमाणे 18 करण्यात येणार आहे.

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ही माहिती दिली. कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मागील तीन-चार महिने शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली होती. सक्रिय रुग्णांची संख्या 50 पेक्षाही कमी झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून ही संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. सध्या रुग्णालयात केवळ 18 रुग्ण दाखल असून, दोन रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोरोनाचे सौम्य स्वरूप आणि आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण, यामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागणार्‍या किंवा ऑक्सिजनची गरज भासणार्‍या रुग्णांची संख्या कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिल्पा शेट्टीचे स्वतःला व्हॅनिटी व्हॅनचे गिफ्ट!

अशी वाढली रुग्णसंख्या

30 मे – 24
31 मे – 33
1 जून – 68
2 जून – 65
3 जून – 72
4 जून – 68
5 जून – 63
6 जून – 46
7 जून – 81
8 जून – 124

शहरातील खासगी केंद्रांवर मिळून दररोज एकूण सुमारे 1500 चाचण्या होत आहेत. लवकरच शहरातील कोरोना तपासणी केंद्रांची संख्या 8 वरून 18 करण्यात येणार आहे.
              – डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका

हेही वाचा 

राज्यात होणार आशियातील पहिले कायदा विद्यापीठ

विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार? आज अर्ज भरण्याची शक्यता

धक्कादायक! भांडुपमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून युवकाला ठार मारले, ४ जणांना अटक

Back to top button