

पुढारी ऑनलाईन : शिल्पा शेट्टीने तिच्या 47 व्या वाढदिवसानिमित्त स्वतःला एका लक्झरी व्हॅनिटी व्हॅनचे गिफ्ट दिले आहे. शिल्पाने 8 जूनला आपला वाढदिवस साजरा केला. कोट्यवधींचे बंगले आणि लक्झरी कारचा ताफा असलेल्या शिल्पाच्या कलेक्शनमध्ये आता ही आलिशान व्हॅनिटी व्हॅन समाविष्ट झाली आहे.
शिल्पा शेट्टीने एक स्वँकी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली आहे. त्यामध्ये किचन, हेअर वॉश स्टेशन, योगासने करण्यासाठी खास जागा, मेकअपसाठी ड्रेसिंग टेबल वगैरे आहेत. व्हॅनमधील लाऊंज एरियात आराम करता येऊ शकतो. पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेला तिचा पती राज कुंद्रानेही तिला यापूर्वी अनेक महागड्या भेटी दिलेल्या आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने दुबईत असलेली जगातील सर्वात उंच इमारत 'बुर्ज खलिफा'मधील फ्लॅट तिला गिफ्ट म्हणून दिला होता!
हेही वाचलंत का?