विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार? आज अर्ज भरण्याची शक्यता | पुढारी

विधानपरिषदेसाठी सदाभाऊ खोत भाजपचे सहावे उमेदवार? आज अर्ज भरण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेसाठी भाजपकडून सहावा उमेदवार म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. भाजपकडून त्यांना मुंबईला बोलावण्यात आले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरण्याची शक्यता आहे.

काल (दि. ८) रोजी भाजपकडून राम शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय या पाचजणांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे सहाव्या जागेसाठी कोणाचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज (दि ९) ला भाजपकडून खोत यांना मुंबईला बोलावण्यात आल्यानंतर सहाव्या जागेवर जवळ जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे.

Nashik: ..तर कृषिमंत्र्यांना भिकेचे पैसे देऊ- सदाभाऊ खोत

Back to top button