पुणे : टोमॅटो उत्पादकांमध्ये ‘कही खुशी कही गम’ | पुढारी

पुणे : टोमॅटो उत्पादकांमध्ये ‘कही खुशी कही गम’

दिवे : पुढारी वृत्तसेवा

सध्याच्या प्रचंड तापमानामुळे सर्वच पिकांचे उत्पादन घटले आहे. परिणामी, सर्वच शेतमालाचे बाजारभाव वाढत आहेत. टोमॅटो पिकाने मात्र या वर्षी उच्चांक केला आहे. टोमॅटोला सध्या तब्बल 70 ते 80 रुपये किलोला बाजारभाव मिळत आहे. मात्र, काही ठिकाणी उत्पादन घटल्याने ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती शेतकर्‍यांवर आली आहे.

केज-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी ४ जणांचा मृत्यू

सध्या मिळणार्‍या बाजारभावाने बर्‍याच दिवसांचे रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात हमखास चार पैसे पडतील, अशी आशा होती. मात्र प्रचंड उष्णतेमुळे टोमॅटोवर लाल कोळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादन निम्म्याने घटले आहे.

राहुल गांधींना ईडीची पुन्हा एकदा नोटीस

दिवे येथील प्रगतशील शेतकरी संजय झेंडे यांनी आपल्या दहा गुंठे क्षेत्रावरील पॉलिहाउसचे छत फाटल्याने इतर पिके न घेता टोमॅटोची लागवड केली. सध्या टोमॅटो तोडणी सुरू आहे. परंतु महागडी औषध फवारणी करूनदेखील लाल कोळीचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यामुळे माल कमी मिळत आहे. परंतु बाजारभाव जास्त मिळत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

शिवलिंग शोधण्यापेक्षा काश्मीर पंडितांना वाचवा; संजय राऊतांचा भाजपला टोला

झेंडे दरवर्षीच आपल्या शेततळ्याच्या पाण्यावर टोमॅटोची लागवड करतात. मात्र मागील वर्षी त्यांना किलोला अवघा पाच रुपये बाजारभाव मिळाला होता. त्यामुळे त्यांनी टोमॅटोत बकर्‍या सोडल्या होत्या, तर यावर्षी त्यांना उच्चांकी दर मिळाला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. एवढी वर्षे टोमॅटोची लागवड करतो; मात्र एवढा बाजारभाव कधीच मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांना पत्नी वैशाली झेंडे तसेच सुना प्रियंका झेंडे व सुप्रिया झेंडे या मदत करतात असे त्यांनी सांगितले.

Back to top button