माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी यांचे निधन | पुढारी

माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी यांचे निधन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे माजी साखर आयुक्त अरविंद रेड्डी (वय ८४ ) यांचे शुक्रवारी (दि.२६) दुपारी बारा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर  उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या मागे आनंद आणि अमर ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रेड्डी यांनी जिल्हाधिकारी म्हणून धुळे, ठाणे येथे काम केले होते. राज्याच्या साखर आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या साखर आयुक्त पदाच्या कारकिर्दीत सध्याच्या साखर संकुल वास्तूचे भूमिपूजन झाले आणि बांधकाम पूर्ण होऊन या इमारतीचे उद्घाटनही त्यांच्याच कारकिर्दीत १ जानेवारी २००१ रोजी झाले. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत  ए. आर. अंतुले यांचे खासगी सचिव म्हणूनही काम पाहिले. शासकीय सेवेतील निवृत्तीनंतरही ते दीर्घकाळ मुंबई मॅरेथॉनशी संलग्न होते.

हेही वाचा 

Back to top button