केज-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी ४ जणांचा मृत्यू | पुढारी

केज-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांची संख्या वाढली; आणखी ४ जणांचा मृत्यू

केज; पुढारी वृत्तसेवा

केज-अंबाजोगाई महामार्गावरील( क्र. ५४८(डी)) चंदन सावरगाव ते होळ दरम्यान झालेल्या रिक्षा व इनोव्हा कारच्या अपघातातील मयतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात काल चौघांचा मृत्यू झाला होता. यामधील आज आणखी चौघांचा मृत्यू झाला असून, मयतांची संख्या आठ झाली आहे.

केज अंबाजोगाई या महामार्गावर चंदन सावरगाव ते होळ दरम्यान गुरूवारी (दि.२) सायंकाळी ५ च्या दरम्यान रिक्षा क्रं. (एम एच-२३/एक्स-५२२९) आणि इनोव्हा कार क्रं (एम एच-१६/सी एन-७००) यामध्ये हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये मच्छिंद्रसिंग ग्यानसिंग गोके (४८ वर्ष), प्रिया दीपकसिंग गोके (२ वर्ष), वीरसिंग दीपकसिंग गोके (१ वर्ष) आणि रिक्षा चालक बालाजी मुंडे (३५ वर्ष) या चौघांचा जागीच मृत्यू झाला होता.

अपघातातील इतर आठ जखमींवर अंबाजोगाई आणि लातूर येथे उपचार सुरू असतानाच जखमींपैकी हरजितसिंग बादलसिंग टाक, दीपकसिंग मच्छिंद्रसिंग गोके, चंदाबाई बादलसिंग टाक, भारती कौर दिपकसिंग गोके या चौघांचा आज (दि.०३) मृत्यू झाला. ही माहिती युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button