पुणे : काँग्रेसला हवाय सत्तेचा रिमोट ; आगामी पालिका निवडणुकीत जागा वाढवण्यावर भर  | पुढारी

पुणे : काँग्रेसला हवाय सत्तेचा रिमोट ; आगामी पालिका निवडणुकीत जागा वाढवण्यावर भर 

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पुण्यात आगामी निवडणुकीत काँग्रेसने नगरसेवकांची संख्या वाढविण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. एकहाती सत्ता मिळणार नसली, तरी काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत कोणाला सत्ता स्थापन करता येणार नाही एवढे नगरसेवक निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जात आहे. काँग्रेसने सध्याची दहा नगरसेवकांची संख्या 20 ते 35 पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. महापालिकेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसची घसरण होत गेली. 2017 मध्ये सर्वांत कमी म्हणजे दहा जागा मिळाल्या.

सोशल मीडियावरही जुनैदचे गौडबंगाल; बनावट अकाउंट, निधीबाबत कसून चौकशी

मोदी लाट, राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता, चार सदस्यांचा प्रभाग याचा फटका त्यांना बसला. त्यातच काही सहकारी पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वतःची ताकद असलेले तुल्यबळ कार्यकर्तेच निवडून येऊ शकले. आता प्रभागरचना बदलली आहे. ताकदवान कार्यकत्र्यांच्या मदतीला नवे उमेदवार दिल्यास काही प्रभागात यश मिळू शकते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेसने प्रभाग निवडण्यास प्रारंभ केला आहे.

शंभर वर्षांपेक्षा जुन्या मशिदींचे गोपनीय सर्वेक्षण; सर्वोच्च न्यायालयात याचिका

आघाडी होणार का?
काँग्रेस स्वबळावरच निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार की नाही, यावर अद्याप चर्चा सुरू झालेली नाही. आघाडी करावयाची असल्यास शेवटच्या टप्प्यात निर्णय न घेता, तो लवकर घ्यावा, अशी स्थानिक नेत्यांची सूचना आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवार ठरवून त्यांच्यामागे ताकद उभी करणे सोयीचे ठरेल, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीसाठी पुढाकार घेतल्यास, जागावाटपात काँग्रेस आणि शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात, ही या दोन्ही पक्षांची अपेक्षा आहे.

बोरिस जॉन्सन यांचा पुतीन यांना टोला; म्हणाले, ‘वेड्या हुकूमशहाशी संवाद साधणे अशक्य’

काँग्रेसची सध्याची ताकद
काँग्रेसच्या दहा नगरसेवकांपैकी सात जण पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. या भागात नवी प्रभागरचनाही त्यांना तुलनेने अनुकूल झाली आहे. त्यातील दोन नगरसेवक पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता आहे, तर रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघातील प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. उर्वरित चौघांवर आपापल्या प्रभागातून निवडणूक लढविताना त्यांच्यावर पक्षाच्या आणखी काही उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी सोपविली गेली आहे. अरविंद शिंदे, अविनाश बागवे, लता राजगुरू हे त्या भागातील नगरसेवक आहेत. कसबा पेठेतून आणखी दोन नगरसेवक निवडून आणण्याची रणनीती आखण्यात येत आहे.

कोथरूडमध्ये काँग्रेसचे चंदूशेठ कदम आणि वैशाली मराठे एका प्रभागातून निवडून आले होते. त्या प्रभागात काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात समन्वय झाल्यास तेथील तिन्ही जागा या दोन्ही पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर मतदारसंघात दत्ता बहिरट, मनीष आनंद, पर्वती मतदारसंघात आबा बागूल हे स्थानिक नेते आहेत. वडगाव शेरी, हडपसर, शिवाजीनगर यांसह अन्य मतदारसंघांतही काँग्रेसचे काही नवे जुने कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. वडगाव शेरी, शिवाजीनगर मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार केवळ पाच हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे काँग्रेसची काही भागांत निश्चित ताकद आहे.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार; १८ विद्यार्थ्यांसह २१ जणांचा मृत्यू

काँग्रेसची सध्याची तयारी
पक्षाने डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी सुरू केली. पूर्वीच्या 21 हजार सदस्यांत वाढ होऊन आता पुणे शहरात 68 हजार सदस्य नोंदले गेले आहेत. ब्लॉकपासून विधानसभा मतदारसंघापर्यंत पक्षबांधणी झाली असून, प्रत्येक प्रभागात येत्या पंधरवड्यात मेळावे, बैठका घेण्यात येणार आहेत. पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोअर कमिटी नेमली आहे. आमदार संग्राम थोपटे समन्वयक आहेत. येत्या आठवड्यात त्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटातटाचे राजकारण आहे. आघाडी झाल्यास काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा येतात, ते महत्त्वाचे ठरेल. मात्र, किमान तीस जागा जिंकल्यास महापालिकेतील सत्तेचा रिमोट कंट्रोल काँग्रेसच्या हाती येईल. हा रिमोट मिळविण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार सध्या तरी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. आघाडी करावयाची असल्यास लवकर निर्णय घ्यावा, तसेच समाधानकारक जागा मिळाव्यात, अशी सूचना आम्ही पक्षश्रेष्ठींना केली. मतदारसंघाची जबाबदारी तेथील प्रमुख कार्यकर्त्यांवर सोपविली आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे, ही पक्षाची भूमिका आहे. ते नसले तरी ओबीसींसाठी ठरलेल्या जागा दिल्या जातील. नगरसेवकांनी आपल्या सोबत एक-दोन जणांना निवडून आणल्यास नगरसेवकांची संख्या वाढेल.

                                                                      – रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष

काँग्रेसची शहरात निश्चित स्वरूपाची ताकद आहे. काही प्रभागात नवे व तरुण चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवू. ज्येष्ठ नगरसेवकांच्या मदतीने ते निवडून येतील. विरोधी पक्षात सध्या अंतर्गत वाद वाढले आहेत. त्याचा फायदा काँग्रेसला होईल.

                                                          – मोहन जोशी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष

पुण्यात भाजप किंवा राष्ट्रवादी एकहाती सत्ता मिळवू शकणार नाही. त्यामुळे काँग्रेसने अधिक जागा जिंकल्यास महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस व शिवसेनेला महत्त्वाची भूमिका वठविता येईल. निवडून येण्याची शक्यता असलेल्या जागांमागे काँग्रेसने पूर्ण ताकद लावून निवडणूक लढवावी. त्यामुळे पक्षाला गेल्या वेळच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक जागा मिळतील.

                                                                      – अरविंद शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक

हेही वाचा

शासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या 30 जूननंतरच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : पुणतांब्याच्या हाकेला मुंजवाडच्या ग्रामसभेची साथ

मुंबई : सर्वच झोपडपट्ट्या होणार ‘अधिकृत’

Back to top button