बोरिस जॉन्सन यांचा पुतीन यांना टोला; म्हणाले, ‘वेड्या हुकूमशहाशी संवाद साधणे अशक्य’ | पुढारी

बोरिस जॉन्सन यांचा पुतीन यांना टोला; म्हणाले, ‘वेड्या हुकूमशहाशी संवाद साधणे अशक्य’

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाकडून गेल्या चार महिन्यांपासून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. यानंतर पुतीन यांची जगभरात प्रतिमा बदलली आहे. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, पुतीन एक मगर आहेत जे युक्रेनचा पाय खात आहेत. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एका वेड्या हुकूमशहाशी संवाद करणे अशक्य आहे.

बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनला रॉकेट लाँचर्स देण्याची मागणी नाटोकडे केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बोरिस जॉन्सन म्हणाले की, संकटात असलेल्या युक्रेनला रॉकेट सिस्टीमची गरज आहे. जर असे रॉकेट युक्रेनला मिळाले तर रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण मिळेल.

पुतीन यांच्यासोबत शांततेविषयी चर्चा करणे अशक्य

पुतीन सर्वांशी संवाद साधतील, युद्ध थांबवतो म्हणतील, पण तोपर्यंत युक्रेनच्या मोठ्या भागावर रशियाने वर्चस्व प्रस्थापित केलेले असेल, असे जॉन्सन यावेळी बोलताना म्हणाले. पुतीन यांच्यासोबत शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य नाही. जर पुतीन यांच्याशी सर्वांनी संवाद साधला तर त्यातून काहीही समाधान होणार नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button