राज्यात यवतमाळ होरळला; तापमान ४६ अंशावर

राज्यात यवतमाळ होरळला; तापमान ४६ अंशावर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी अकोल्याच्या पारा ४५ अंशावर गेला होता. रविवारी अकोल्याला मागे टाकत यवतमाळ जिल्ह्याचे तापमान ४६ अंशावर गेल्याचे दिसून आले. राज्यातील सर्वाधिक तापमान ४६ अंशावर पारा गेल्याने यवतमाळ जिल्हा होरपळून गेला असल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ अकोला, ब्रम्हपुरी, अमरावती, गोंदिया या जिल्ह्यांचाही पारा वाढल्याचे दिसून आले.

शुक्रवार पासून महाराष्ट्रात पूर्व विदर्भ राज्यात हॉट ठरत आहे. राज्यात पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याने या जिल्ह्यात प्रचंड उकाडा जाणवत आहे. या तापमानाशी जुळवून घेणं नागरिकांना कठीण झालं आहे. वाढत्या तापमानाने अंगाची लाही लाही होत असताना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी ४५.५ अंशावर पोहचलेल्या अकोल्याला मागे टाकत रविवारी यवतमाळ जिल्ह्याचा पारा ४६ अंशावर पोहचला.

आज हवामान खात्याने घेतलेल्या नोंदीनुसार यवतमाळ ४६ अंश, अकोला ४५.२, ब्रम्हपुरी ४५, गोंदिया ४४.४, अमरावती ४४.२, वर्धा ४४.१, वाशिम ४३.४, गडचिरोली ४३.३, भंडारा ४३.३, चंद्रपूर ४३.२, नागपूर ४२.४ अंशावर पारा चढला आहे. तर बुलढाणा ३८.८ अंशावर आहे.
दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होत आहे. भंडारा जिल्ह्यात उष्माघाताने १५०० कोंबड्याचा मृत्यू झाल्याची वृत्त आहे.

उष्णतेमध्ये अकोला ऑरेज तर, अमरावती व चंद्रपूर यलो अलर्ट

 राज्यात यवतमाळचा पारा सर्वात जास्त असता तरी, अकोलाला उष्णलहरीचा धोका लक्षात घेता हवामान खात्याने ऑरेंज अर्लट चा इशारा दिला आहे. आज अकोल्याचा तापमान ४५.२ अंशावर गेल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी लष्ण लहरीची दाट शक्यता आहे. २८ मे पर्यंत ऑरेंज तर २९ तारेखला येलो अलर्टचा इशारा दिला आहे. चंद्रपूरला उष्णलहरीचा २८ मे पर्यंत इशारा देण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news