‘उत्पादन शुल्क’विभागाची कोटींची उड्डाणे; मद्यनिर्मिती युनिटकडून सर्वाधिक उत्पन्न | पुढारी

‘उत्पादन शुल्क’विभागाची कोटींची उड्डाणे; मद्यनिर्मिती युनिटकडून सर्वाधिक उत्पन्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा 
राज्य उत्पादन शुल्क विभागास पुणे शहर आणि जिल्ह्यातून 1 हजार 871 कोटी 37 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाला राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षी 2 हजार 50 कोटी रुपयांचे महसूलाचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टाच्या बदल्यात पुणे शहर आणि जिल्ह्याने 1 हजार 871 कोटी 37 लाख रुपयांचा मह्सूल वसूल केला आहे. त्यामध्ये मद्य मॅन्युफॅक्चरिंग  युनिटडून  जादा परमिट रूम बिअर बार आणि वाईन शॉपपेक्षा जास्त महसूल मिळाला असल्याची माहिती या विभागाचे शहर जिल्हा अधिक्षक संतोष झगडे यांनी दिली.
शहरात कार्यरत असलेल्या मद्य मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये सर्वाधिक महसूल बारामती येथील युनायटेड स्पिरीट (पिंपळी) येथील युनिटकडून (1111.60 कोटी) मिळाला. त्या खालोखाल हडपसर येथील असोसिएटेड ब्लेडर्सकडून 279 कोटी, डेल्टा
डिस्टलरीकडून (हडपसर) 3.50 कोटी, लोकरंजन ब्रेव्हरीजकडून (हडपसर- देशी दारू निर्मिती ) 65 कोटी 15 लाख रुपये एवढा महसूल मिळाला आहे. उर्वरित महसूल शहर जिल्ह्यातील वाईन शॉप, परमिट रूम बिअर बार, बिअर शॉपी यामधून मिळाला आहे.
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दिलेले 2 हजार 50 कोटी या उद्दिष्टाच्या अगदी जवळपास 1 हजार 871 कोटी 37 लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. उद्दिष्टाच्या जवळपास म्हणजेच 91. 50 टक्के महसूल मिळविला आहे.
                                                                                       – संतोष झगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
हेही वाचा:

Back to top button