गुजरातमध्ये आकाशातून कोसळले चिनी रॉकेट्सचे अवशेष | पुढारी

गुजरातमध्ये आकाशातून कोसळले चिनी रॉकेट्सचे अवशेष

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांत गुजरातच्या काही गावांमध्ये आकाशातून चार गोलाकार धातूचे गोळे पडले आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हे चिनी रॉकेटचे अवशेष असावेत असा अंदाज आहे. सुदैवाने या गोळ्यांमुळे कोणी जखमी झाले नसून कोणती हानी झाली नसल्याचे आनंदचे पोलिस उपअधीक्षक बी. डी. जडेजा यांनी सांगितले आहे.

‘शुक्रयान’ मोहीम : चंद्र, मंगळानंतर आता इस्रो शुक्र मोहिमेसाठी सज्ज

संबंधित धातूचे गोळे पोलिसांनी जप्त करून त्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) तसेच अहमदाबादमधील भौतिक संशोधन प्रयोगशाळा यांचा सल्ला घेणार असल्याचे जडेजा यांनी सांगितले. याबद्दल बोलताना इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ बी. एस. भाटिया म्हणाले की, हे धातूचे गोळे रॉकेट आणि उपग्रहांमधील इंधन टाक्यांचे अवशेष असू शकतात. तर अमेरिकास्थित खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांनी १२ मे रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हे धातूचे गोळे चिनी रॉकेट चांग झेंग ३बी, ज्याला सामान्यतः सीझेड ३बी असे म्हणतात, त्याचे अवशेष असू शकतात जे सामान्यतः पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून नष्ट होतात.

हेही नक्की वाचा….

Back to top button