देशातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये जमीन, सदनिका यांची खरेदी करू शकणार आहे.जम्मू-काश्मीरमध्ये त्या राज्याचा नोंदणी कायदा आहे. आता केंद्र सरकारचा नोंदणी व मुद्रांक कायद्याची अंमलबजावणी होणार असल्याने महाराष्ट्र राज्याच्या नोंदणी विभागाची कार्यपध्दतीचा अभ्यास करण्यासाठी जम्मू-काश्मीरचे नोंदणी महानिरीक्षक, अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक, दुय्यम निबंधक या अधिकार्यांनी नुकताच पुणे दौरा केला.