अहमदनगर : साईचरणी चार किलो सोन्याची फ्रेम दान | पुढारी

अहमदनगर : साईचरणी चार किलो सोन्याची फ्रेम दान

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : साईबाबांची महती आणि करोडो साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीत दानाचेही दिवसेंदिवस नवे विक्रम होत आहेत. मंगळवारी साई बाबांच्या मूर्तीच्या खालील बाजूच्या चौथर्‍यास 2 कोटी रुपयाची 4 किलो सोन्याची फ्रेम एका भाविकांने साई चरणी अर्पण केली आहे.

शिर्डीच्या साई मंदिरात यापूर्वीही दानाचे विक्रम झालेले आहेत. मंदिरातील साई मूर्तीला सिंहासन, मंदिराचा गाभारा सोन्याने मढविण्यात आलेला आहे. समाधीही सोन्याने घडविण्यात आली आहे. त्याप्रमाणे मंदिर परिसरातील मुख्य कळस, शनी, गणेश, महादेव, गुरुस्थान, नंदादीप या मंदिराचे कळस सोन्याचे केलेले आहे.

हेही वाचलत का? 

Back to top button