पुणे : नियो मेट्रोचा आराखडा अंतिम टप्प्यात | पुढारी

पुणे : नियो मेट्रोचा आराखडा अंतिम टप्प्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील प्रस्तावित उच्च क्षमता द्रुतगती मार्गावर (एचसीएमटीआर) नियो मेट्रो प्रकल्प राबविण्यासंबंधीचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. या मार्गात महामेट्रोने काही बदल सुचविले असून, त्यावर महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Asian Games Postponed : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! आशियाई क्रीडा स्पर्धा स्थगित

शहराच्या हद्दीत 36 किमीचा एचसीएमटीआर मार्ग आरक्षित आहे. त्यावर आता नियो मेट्रो राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासंबंधीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम शासनाने महामेट्रोला दिले आहे. त्यानुसार महामेट्रोने हा आराखडा तयार केला असून, गुरुवारी आयुक्त विक्रम कुमार यांच्यापुढे या प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण झाले. त्यात महामेट्रोने या प्रस्तावित नियो मेट्रो मार्गात काही ठिकाणी बदल सुचविले आहेत. त्यामुळे या मार्गाची रचना बदलणार आहे. मात्र, हे बदल कितपत आवश्यक आहेत, यासंबंधीची पाहणी महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन करणार आहेत.

भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरून प्रचंड राडेबाजी; पंजाब पोलिसांवर दिल्लीत गुन्हा दाखल

त्यासाठी पथ, बांधकाम, प्रकल्प, मालमत्ता व्यवस्थापन यांच्या अधिकार्‍यांचे एक पथक तयार करण्यात आले असून, महामेट्रोच्या अधिकार्‍यांसमवेत हे अधिकारी ज्या ठिकाणी मार्गात बदल सुचविण्यात आले आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतील आणि त्यानंतरच हे बदल अंतिम करण्यासंबंधीचा निर्णय घेतील, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले. या बदलाबाबत निर्णय झाल्यानंतरच एचसीएमटीआर मार्गावरील नियो मेट्रोचा आराखडा अंतिम होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मशिदींवर अजानसाठी भोंगे वापरणे हा मूलभूत अधिकार नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

काही ठिकाणचा मार्ग अडचणीचा

एचसीएमटीआर मार्गातील काही ठिकाणचा रस्ता प्रत्यक्षात 12 मीटर रुंदीचा आहे. त्यावरही एचसीएमटीआर मार्गाचे पिलर आल्यास या रस्त्यांची रचना आणखी अरुंद होणार आहे. त्यामुळे अशा काही मार्गांबाबत पालिका प्रशासनाकडून बदल सुचविले जाण्याची शक्यता आहे.

Back to top button