रत्नागिरी : गणपतीपुळेहून मुंबईकडे जाताना उक्षी घाटात ट्रॅव्हल्सला अपघात, 1 गंभीर, 2 जखमी

रत्नागिरी : गणपतीपुळेहून मुंबईकडे जाताना उक्षी घाटात ट्रॅव्हल्सला अपघात, 1 गंभीर, 2 जखमी
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : करबुडे-उक्षी मार्गावर ट्रॅव्हल्सला अपघात होऊन एक गंभीर तर किरकोळ जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.19) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुंबईहून गणपतीपुळे येथे पर्यटक दर्शनासाठी आले होते. रविवारी दिवसभर दर्शन आणि समुद्र सफरीचा आनंद घेतल्यानंतर ट्रॅव्हल्सने मुंबईकडे निघाले. उक्षी घाटात ट्रॅव्हल्सचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवाशांना याची कल्पना दिली. यामुळे सारे प्रवाशी घाबरले होते.

गाडीत 35 प्रवाशी होते. ब्रेक निकामी झाल्याचे कळताच अनेकांनी गाडी बाहेर उड्या घेतल्या. याचवेळी चालकाने प्रसंगावधान राखत डोंगरात गाडी घातल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा डाव्या बाजूला 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातात शुभम कुंभारकर ( वय २१, रा. पनवेल) हा गंभीर जखमी झाला आहे, तर 2 जण किरकोळ जखमी झाल्याचे समजत आहे. अपघातातील जखमींना उक्षी गावचे उपसरपंच मिलिंद खानविलकर यांनी वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी रत्नागिरी सिव्हील येथे नेण्यात आले आहे. तर या अपघातातून वाचल्याने साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

सदर अपघाताची माहिती मिळताच उक्षी गावचे तंटामुक्त अध्यक्ष संदेश जोशी,पोलीस पाटील अनिल जाधव,उपसरपंच मिलिंद खानविलकर, मुझम्मील काझी, ताबिश राजापकर, आसिर हमदारे,रेहान खान,कृष्ण गोनबरे,गजानन पानगले, सुहास रावणंग,संतोष देवळेकर,महेश रावणंग,अमोल कांबळे,स्वप्नील जोशी,अझर गोलंदाज इत्यादी ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. उशिरापर्यंत अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news