कात्रज डेअरीकडून गायीच्या दूध खरेदीदरात 3 रुपये वाढ | पुढारी

कात्रज डेअरीकडून गायीच्या दूध खरेदीदरात 3 रुपये वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज डेअरीने गायीच्या दूध खरेदीदरात प्रतिलिटरला तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कात्रजकडून गायीच्या दुधाची खरेदी आता लिटरला 27 वरून 30 रुपये दराने होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 मार्चपासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दिली.

Russian invasion of Ukraine : रशियन सैन्यानं खेरसन शहर घेतलं ताब्यात, युक्रेनमधील ५ शहरे उद्ध्वस्त

जागतिक बाजारात दूध पावडरच्या दरात वाढ झालेली आहे तसेच खासगी डेअर्यांनीही गायीच्या दूध खरेदीचे दर वाढविलेले आहेत. त्यामुळे कात्रज दूध संघाच्या संकलनात दुधाचे खरेदीदर कमी असल्याने मोठ्या प्रमाणात घट येऊ लागली होती. संघाचे रोजचे दूधसंकलन 2 लाख 10 हजार लिटरहून कमी होऊन 1 लाख 84 हजार लिटरपर्यंत खाली आले होते.

Russia Ukraine war : पाकिस्तान, तुर्कीने घेतला भारतीय तिरंग्याचा आधार

संघाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दूध खरेदी दरवाढीबाबत परवानगी मिळण्यासाठीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाल्यामुळे दूध खरेदी दरवाढीवर शिक्कामोर्तब करीत निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतलेला आहे. त्यानुसार गायीच्या 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाची खरेदी 30 रुपये दराने होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक स्वच्छ, ताज्या व उच्चतम गुणप्रतीच्या दुधाचा शेतकऱ्यांनी कात्रज दूध डेअरीस पुरवठा करण्याचे आवाहनही क्षीरसागर यांनी केले आहे.

हेही वाचा

नवीन शेखरप्पा : केंद्र सरकारला नविनचे पार्थिव आणण्यात अडचणी, वडिलांचा आक्रोश

युक्रेनमध्ये अजुनही ३ हजार भारतीय विद्यार्थी अडकले

त्र्यंबकला ब्रम्हगिरी पर्वतावर लागलेल्या आगीत शेकडो वृक्ष जळून खाक

Back to top button