आम्ही मास्कबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अनुकरण करतो : संजय राऊत | पुढारी

आम्ही मास्कबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अनुकरण करतो : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : आम्ही मास्कबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अनुकरण करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावत नाहीत म्हणून आम्ही मास्क लावत नाही, असं सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मास्क लावा म्हणून सांगतात आणि स्वत: लावत नाहीत. राज्यातील कोरोना स्थितीबाबत बोलताना त्यांनी प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहन केले. राज्यात सध्या रात्रीची संचारबंदी लागू आहे. पण दिवसा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये असं वाटते. तसं झाल्यास नोकरी, धंद्यावर संकट येईल. राज्याचं अर्थचक्र थांबेल. तसं होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. असंही खासदार राऊत म्हणाले.

आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूरला चार पदके, मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकरची सुवर्ण कामगिरी

देशातील जनता मोदींचे ऐकते. मी सुद्धा त्यांचे अनुकरण करतो. जागतिक व्यासपीठावरील किंवा देश पातळीवरील कुठल्याही कार्यक्रमात मोदी मास्क लावत नाहीत. म्हणून लोकही लावत नाहीत. लोकांना विचारले तर ते मोदींकडे बोट दाखवतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मास्क वापरायला हवा. असही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचलत का?

Back to top button