कालीचरण महाराज पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

कालीचरण महाराज पोलिसांच्या ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क

मध्य प्रदेशातील खजुराहो येथून कालिचरण महाराज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. याचे पडसाद महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

महात्मा गांधी यांच्यासंदर्भात कालीचरण महाराज काय म्हणाले होते?

धर्मगुरू कालीचरण महाराज महात्मा गांधी यांच्या संदर्भात अपमानजनक शब्द वापरताना म्हणाले की, “नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीची हत्या करून योग्य पाऊल उचलले. इस्लाम धर्माचे लक्ष्य हे राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर नियंत्रण ठेवणं आहे. आपल्या डोळ्यांदेखत १९४७ साली राष्ट्रावर नियंत्रण मिळवलं होतं. यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवलं होतं. राजकारणाच्या माध्यमातूनही पाकिस्तान आणि बांगला देशावर नियंत्रण मिळवलं. मी नथुराम गोडसे यांना सलाम करतो. कारण, त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली.” त्यांच्या या विधानावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दुजोरा दिला होता.

Back to top button