साहित्य संमेलन : दोन दिग्गज व्यासपीठावर भिडतात तेव्हा… | पुढारी

साहित्य संमेलन : दोन दिग्गज व्यासपीठावर भिडतात तेव्हा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील मोठी आणि चर्चेची बाब आहे. वर्तमान परिस्थितीत साहित्य संमेलन दर्जेदार साहित्यकृतींमुळे कमी आणि इतर वादग्रस्त मुद्द्यांमुळे माध्यम वर्तुळात चर्चेचा विषय बनून जात आहे. असो. पण, कधीकाळी त्या वादालाही धार होती, राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत होते. असाच एक चर्चात्मक किस्सा १९७५ सालच्या कराडमधील साहित्य संमेलनात झालेला होता. तो किस्सा आज नाशिकच्या साहित्य संमलेनाच्या निमित्ताने आपण पाहू…

तर झालं असं की, २६ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झालेली होती. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या निवडणुका झाल्या नाहीत. अशा साहित्य संमलेन भरवायचं की नाही, हा गोंधळ साहित्य वर्तुळात होता. जर यावेळी संमेलन झाली नाहीत तर साहित्यप्रेमींमध्ये वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे पुढच्या पाच महिन्यांत म्हणजे डिसेंबर १९७५ मध्ये साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलं होतं.

पण, अध्यक्ष कुणाला करणार हा प्रश्न समोर होता. शेवटी सर्वांच्या संमतीने प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा भागवत यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्या १९७५ साली कराड येथे होणाऱ्या साहित्य संमलेनाच्या अध्यक्षपदी आल्या.

दुर्गाबाई भागवत यांनी ‘आठवले तसे’ या पुस्तकात सांगितलं आहे की, “आणीबाणीचे कार्य संपले आहे. तेव्हा आता आणीबाणी उठविण्यात यावी, अशा आशयाचे एक पत्रक इंदिरा गांधी यांनी साहित्यिकांतर्फे देण्यात येणार होतं. या पत्रावर २०० साहित्यिकांनी स्वाक्षऱ्याही केल्या. नंतर हे पत्र यशवंतराव चव्हाण यांना द्यावं, असंही ठरलं. देशातील आणीबाणी उठवावी. पण, यासाठी सरकारला विनंती करून नव्हे.”

शेवटी त्या पत्रकावर अध्यक्ष म्हणून दुर्गाबाईंनी स्वाक्षरी करून हे पत्र यशवंतरावांना द्यावं, अशी विनंती साहित्य समितीमधील लेखकांनी केली. त्यावर दुर्गाबाई म्हणाल्या की, “हे पत्रक माझ्या हातून किंवा कुणा प्रतिनिधीच्या हातून या मांडवातून दिलं जाणार नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या मांडवाबाहेर त्या पत्राची पाठवणी करा”, अशा स्पष्ट शब्दांत दुर्गाबाई भागवत यांनी सांगितलं.

दुर्गाबाई भागवतांनी त्यांचा शब्द पाळला व आणीबाणीविरोधातील ठराव मांडला. पण, दुर्गाबाई भागवतांनी भीती होती की, आपण आणीबाणीविरोधात बोललो नाही तर आपण लोकांना तोंड दाखवू शकणार नाही. आता आणीबाणीचा निषेध कसा नोंदवणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यांनी आणीबाणीला प्रखर विरोध करणारे जयप्रकाश नारायण यांची तब्येत खालावली. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचा निश्चय दुर्गाबाईंनी केला.

प्रत्यक्ष साहित्य संमेलन सुरू झाले. त्यादिवशी मावळते अध्यक्ष म्हणून पु. ल. देशपांडे यांचं भाषण सुरू होतं. भाषण ऐन रंगात आले होतं. पण, अचानक त्यांच्याकडून माईक काढून घेण्यात आला आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची जाहीर विनंती करण्यात आली. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये इंदिरा गांधींचे निष्ठावंत आणि काॅंग्रेसचे नेते यशवंतराव चव्हाणदेखील होते.

अशा पद्धतीने आणीबाणीचा विरोध दुर्गाबाई भागवत यांनी नोंदविला. विशेष हे की, या प्रार्थनेमध्ये यशवंतराव चव्हाण अगदी संयतपणे उभे राहिले आणि त्यांनी प्रार्थनेत भाग घेतला. त्यानंतर यशवंतराव चव्हाण काहीतरी प्रतिक्रिया देतील, असं सर्वांना वाटलं होतं. पण, यशवंतरावांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता शांत आणि संयमी राहिले.

हेही वाचलत का?

Back to top button