Jalgaon News : मुख्यमंत्री येणार म्हणून मुंढोळदे गावाला मिळाला रस्ता, लागली लाईट | पुढारी

Jalgaon News : मुख्यमंत्री येणार म्हणून मुंढोळदे गावाला मिळाला रस्ता, लागली लाईट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) गावाचे 30 ते 32 वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले आहे. तेव्हापासून आजही या गावात काही प्रश्न प्रलंबित आहेत. ते घरांची असो जमिनीची असो वा शाळेची असो, मात्र आता गावात मुख्यमंत्री येणार म्हणून या गावातील लोकांचे जणूकाही नशीबच पालटले आहे. गावाला रस्ता व लाईट मिळाली आहे.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता. रावेर, जि.जळगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमीपुजन होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिपॅड या गावात आल्याने या गावाचा अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री येण्यापूर्वीच तयार करण्यात आला व रस्त्याच्या आजूबाजूने विजेचे खांब व विजेची केबल टाकण्यात आली. मुख्यमंत्री आल्यामुळे गावकऱ्यांना रस्ता व इलेक्ट्रिकचे खांब वगैरे गेल्याने व खांबावर लाईट लागल्याने फायदा झाला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) या गावाचे जवळपास 30 ते 32 वर्षांपूर्वी पुनर्वसन शासनातर्फे करण्यात आले होते. मात्र या पुनर्वसन कार्यक्रमांमध्ये गावातील हात मजूर असलेल्या ग्रामस्थांकडे शासनाला व शासनाने दिलेल्या जमिनीचा पैसा मोबदला भरण्याची ताकद नसल्यामुळे त्यांचे पुनर्वसन व ती जागा त्यांना मिळालेली नाही ते अजूनही रखडलेले आहेत. गावामध्ये शाळा आहे मात्र ते शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शौचालय जाण्यासाठी संडास किंवा बाथरूमची व्यवस्था नाही. अंगणवाडीची व्यवस्था नाही. गावात सिमेंट काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरणाचे रस्ते नाही मुख्यमंत्री व त्यांचे हेलिपॅड गावात तयार झाल्यामुळे हेलिपॅड पासून कार्यक्रम स्थळापर्यंत येणाऱ्या रस्त्यामध्ये जवळपास अर्धा किलोमीटर चा रस्ता हा खराब असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर येण्यापूर्वीच तो रस्ता तयार करण्यात आला.

तर मुक्ताईनगर पासून मुंढोळदे (खडकाचे) गावापर्यंत येण्यासाठी रस्त्याची साफसफाई रस्त्याच्या आजूबाजूने सपाटीकरण काही ठिकाणी मुरूम टाकण्याचे काम शासकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर पासून ते गावापर्यंत जो रस्ता तयार झालेला आहे त्या रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब तात्काळ टाकण्यात आले व त्या ठिकाणी तात्काळ केबल ओढून दिवे लावण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मुंढोळदे (खडकाचे) गावात आल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे येण्यापूर्वी शासकीय यंत्रणा जागी होऊन तात्काळ काही कामे युद्ध पातळीवर करण्यात आली. दुर्लक्षित गावाकडे अचानक सगळ्यांचे लक्ष जाऊन कामे सुरु झाली आहेत.

आज कार्यक्रमाच्या दिवशीही महावितरण विभागाचे कर्मचारी रस्त्याच्या साईडने काम काढण्याचे काम करताना दिसून आले तर अधिकारी व कर्मचारी रस्त्याच्या बाजूला कुठे घाण वगैरे पडली आहे का याची जाता येता पाहणी करत होते . ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सोपान सपकाळे हे म्हणाले की पुनर्वसनाचा प्रश्न आमचा प्रलंबित आहे. कारण हात मजुरी करणारे व अर्धा बिगा एक बिगा शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांकडे जमिनीचे पैसे भरण्याची व्यवस्था नाही .त्यामुळे अनेक कुटुंबांना अजूनही जागा मिळालेली नाही. शाळेची दुरावस्था आहे. अंगणवाडी नाही. कच्चे रस्ते होते आता मुख्य रस्ता डांबरीकरण व लाईट लागलेले आहे.

हेही वाचा :

Back to top button