AdityaL1: ‘आदित्य एल-१’ ने कॅप्चर केला सूर्याचा नवीन व्हिडिओ, ISRO ने दिली अपडेट | पुढारी

AdityaL1: 'आदित्य एल-१' ने कॅप्चर केला सूर्याचा नवीन व्हिडिओ, ISRO ने दिली अपडेट

पुढारी ऑनलाईन डेस्क: चांद्रयान-३ मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो सातत्याने नवनवीन मोहिमा राबवत आहे. चांद्रयान-३ नंतर इस्रोने ‘आदित्य एल-१’ ही सूर्यमोहिम राबवली. ‘आदित्य एल-वन’ हे यान सध्या अतराळातील लॅग्रेंज पॉईंट-१ (L1) वर स्थिर असून, येथूनचे ते सूर्यासंदर्भातील (AdityaL1) महत्त्वाच्या अपडेट देत आहे. त्याने नुकताच सूर्याचा आकर्षक व्हिडिओ कॅप्चर केला आहे. या संदर्भातील माहिती इस्रोने X पोस्टवरून शेअर केला आहे.

इस्रोने टीपलेला सूर्याचा व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडिया हँडल X वर शेअर केले आहे. ज्यावर माहिती देण्यात आली आहे की, हा सूर्याचा एक नवीन व्हिडिओ (AdityaL1) आहे. जो ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’च्या (Solar Ultraviolet Imaging Telescope) मदतीने टिपला आहे, असे देखील इस्रोने स्पष्ट केले आहे.

AdityaL1: अलीकडेच सूर्यावरील सौरवादळाची छायाचित्रेही टीपली

आदित्य एल1 हे भारताचे सूर्याकडे जाणारे पहिले मिशन आहे. जे 2 सप्टेंबर रोजी इस्रोने लॉन्च केले होते. हे यान पृथ्वीपासून सुमारे १.५ दशलक्ष किमी दूर आहे. अलीकडेच आदित्य L1 ने सूर्यावरील सर्वात मोठे सौर वादळ टिपले होते. हे सौर वादळ 11 मे रोजी 21 वर्षांनंतर आले होते, ज्याची छायाचित्रे आदित्य L1 च्या मदतीने टिपण्यात आली होती. ((AdityaL1)

‘आदित्य एल-१’ मिशनचा उद्देश काय आहे?

इस्रोच्या म्हणण्यानुसार, सूर्याकडे यान पाठवण्याच्या आपल्या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे सूर्यमालेतील सूर्याचे तापमान, सूर्याच्या पृष्ठभागावर होत असलेल्या हालचाली आणि सूर्याच्या चमकण्याशी संबंधित क्रियाकलाप समजून घेणे. तसेच हवामानाशी संबंधित समस्या अभ्यासणे हा आदित्य एल-१ मिशनचा मुख्य उद्देश आहे.

Back to top button