Bengaluru Rameshwaram Cafe Blast | रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे

Bengaluru Rameshwaram Cafe Blast | रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूरमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्यात आला आहे, अशी माहिती सोमवारी सूत्रांनी दिली. पूर्व बंगळूरमधील ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये १ मार्च रोजी झालेल्या स्फोटात किमान १० जण जखमी झाले होते. गृह मंत्रालयाने (MHA) हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे. एनआयए अधिकारी सोमवारपासून (दि.११) हे प्रकरण हाताळतील. रामेश्वरम कॅफेमध्ये हा आयईडी स्फोट कोणी घडवून आणला, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.(Bengaluru Rameshwaram Cafe Blast)

तपास एनआयएकडे

गृह मंत्रालयाने (MHA) हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे.  एनआयए अधिकारी सोमवारपासून (दि.११) हे प्रकरण हाताळतील. या घटनेत किमान १० जण जखमी झाले असून सर्वांवर सध्या अनेक खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कर्नाटक सरकारने याआधीच जाहीर केले आहे की, जखमींवर उपचाराची जबाबदारी राज्य सरकार घेईल.

Bengaluru Rameshwaram Cafe Blast :  नेमकं काय घडलं होतं? 

रामेश्वरम कॅफे हे बंगळूरमधील प्रसिद्ध कॅफे आहे. हे कॅफे व्हाईटफिल्डच्या ब्रूकफील्ड परिसरात आहे, जे शहराचे व्यवसाय केंद्र आणि प्रसिद्ध टेक हब आहे. येथील आयईडी स्फोटाने पुण्यातील जर्मन बेकरी घटनेची आठवण ताजी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅफेमध्ये एक महिला सहा जणांसह बसली होती. त्यानंतर त्याच्या मागे ठेवलेल्या बॅगेत स्फोट झाला. प्राथमिक तपासात आरोपी हा २५ ते ३० वर्षांचा असल्याचे समोर आले आहे. तो रेस्टॉरंटजवळ बसमधून खाली उतरताना आणि चालत येताना दिसला. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, रेस्टॉरंट आणि आसपासच्या भागात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता तरुणाच्या चेहऱ्यावर मास्क होता. तो कॅफेत आला. येथे त्याने कॅश काउंटरवर पैसे दिले आणि रवा इडलीचे टोकन घेतले. इडली खाल्ल्यानंतर डस्टबिनजवळ पिशवी टाकून तो बाहेर गेला. आणि त्यानंतर स्फोट झाला.

रामेश्वरम कॅफेचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र राव म्हणाले की, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आणि कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले. त्यांनी व्यावसायिक शत्रुत्वाचेही खंडन करत म्हणाले  व्यवसाय वर्तुळात कोणीही अशी हानीकारक अशी कृती करण्याची शक्यता नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news