Jalgaon News : ऐनपुर येथे दोन गटात दगडफेक, दोन जखमी  | पुढारी

Jalgaon News : ऐनपुर येथे दोन गटात दगडफेक, दोन जखमी 

जळगांव पुढारी वृत्तसेवा; रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन गटात झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. गावामध्ये तणापुर्ण वातावरण असून घटनास्थळी पोलीस पोचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून तहसीलदार बंडू कापसे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दगडफेक झाली. या दगडफेकीत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुसावळ, यावल, रावेर या ठिकाणावरून पोलीस कुमक तातडीने ऐनपुर गावी मागवण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सी. व्ही. महेश्वर रेडी यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला भेट दिली आहे व तेथील परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली आहे.

गावात दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. तहसीलदार बंडू कापसे व नायब तहसीलदार संजय तायडे व इतर महसूल अधिकारी त्या ठिकाणी पोचले आहेत. तहसीलदारांनी नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button