JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान, सोमवारी मतमोजणी | पुढारी

JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान, सोमवारी मतमोजणी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या २१ संचालकांपैकी ११ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित १० संचालकांच्या निवडणूकीसाठी ४२ उमेदवार सोसायटी व अन्य मतदार संघातून निवडणूक रिंगणात आहेत. या संचालक निवडणूकीसाठी सहकार विभागाचे निवडणूक कर्मचारी सज्ज झाले असून १५ तालुकास्तरावर रविवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर सोमवार २१ रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ८ ते मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी करण्यात येणार आहे.

या निवडणूक निमित्ताने प्रचार यंत्रणा शुक्रवारी थंडावल्या आहेत. यात निवडणूक रिंगणात असलेल्या सहकार व शेतकरी पॅनल मधील ४२ उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार आणि कोण थंडावणार यासह  आणि त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी देखिल चुरस असून कोणाच्या हाती बँकेच्या चाव्या जातात याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष आहे.

जिल्हा बँकेच्या मुदत संपुष्टात आलेल्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रियेनुसार ऑगस्टनंतर सप्टेबरच्या पहिल्या टप्प्यात प्रारूप व अंतिम मतदार यादी प्रसिद्धीनुसार निवडणूक प्रक्रियेनुसार निवडणूकीसाठी अंतिम माघारीनंतर ११ संचालक बिनविरोध निवडले आहेत. तर १० संचालकांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्हा बँक संचालक मंडळाच्या १० संचालक पदांच्या ४२ उमेदवारांसाठी २१ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व १५ तालुकास्तरावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रकिया पार पडणार आहे.

यात जळगाव येथे सु.ग.देवकर शाळा, भुसावळ म्युनसिपल हायस्कूल, यावल जि.प.मराठी मुलींची शाळा, कमलाबाई अगरवाल हायस्कूल रावेर, जे.ई.हायस्कूल मुक्ताईनगर, जि.प.मुलींची शाळा बोदवड, न्यू इंग्लिश स्कूल जामनेर, गो.से.हायस्कूल पाचोरा, सु.गि.पाटील हायस्कूल भडगांव, एच.एच.पटेल प्राथ.विद्यालय चाळीसगाव, एन.ई.एस.हायस्कूल पारोळा, जी.एस.हायस्कूल अमळनेर, कस्तूरबा विद्यालय चोपडा, जि.प.शाळा धरणगांव, आर.टी.काबरे विद्यालय एरंडोल याठिकाणी मतदान तर जिल्हा बँकेच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत मतमोजणी केली जाणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सहकार विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

Back to top button