Pune Crime : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मुलाकडून वृद्ध आईला मारहाण, भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसला | पुढारी

Pune Crime : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मुलाकडून वृद्ध आईला मारहाण, भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसला

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा

Pune Crime : दारू प्यायला पैसे मागितल्यावर ते दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने वृद्ध आईला काठीने मारहाण केली. आईला मारल्यावरून जाब विचारणाऱ्या या मोठ्या भावाने लहान भावाच्या छातीत लोखंडी भाला खुपसल्याची खळबळजनक घटना चासच्या पापळवाडी (ता. खेड) येथे घडली.

या घटनेत लहान भाऊ प्रविण लक्ष्मण शिंदे (वय ४०) हा गंभीर जखमी झाला आहे. आरोपी सुनिल शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी आरोपी सुनिल शिंदे वृध्द आईकडे दारू पिण्यास पैसे मागत होता. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडून सुनिल शिंदे याने आईला शिवीगाळ करून हाता पायावर काठीने मारहाण केली. हा प्रकार भाऊ प्रविण शिंदे याला कळताच आरोपीकडे तू आईला का मारहाण केली? अशी विचारणा केली.

जाब विचारला असता राग मनात धरुन सुनिल याने घरात ठेवलेल्या साप मारण्याच्या लोखंडी भाल्याने प्रविणवर प्रहार केला. भाला धरण्याचा प्रविण याने प्रयत्न केला. मात्र भाला प्रविणच्या दोन्ही हाताला जखमा करून छातीत घुसला. उजव्या बाजुस खोलवर गंभीर जखम झाली. दरम्यान, वृध्द आईला देखील ढकलून देवून जमिनीवर पाडले. (Pune Crime)

तेवढ्यात भांडणे सोडविण्याकरिता गावातील अक्षय अनिल शिंदे, दिपक यशवंत चव्हाण हे आले. ते आल्यानंतर भाऊ सुनिल हा मोटार सायकलवरुन पळून गेला. पोलिसांनी आरोपी सुनिल शिंदे याचा शोध घेऊन अटक केली. जखमी प्रविण याच्यावर पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस हवालदार आर. एन. काबुगडे करीत आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : मिलिंद तेलतुंबडे नक्षलवादी कसा बनला | Milind teltumbde

Back to top button