पिल्लूपासून ते गर्लफ्रेंडच्या नावापर्यंत, पासवर्ड म्हणून भारतीय कोणता शब्द सर्वाधिक वापरतात? | पुढारी

पिल्लूपासून ते गर्लफ्रेंडच्या नावापर्यंत, पासवर्ड म्हणून भारतीय कोणता शब्द सर्वाधिक वापरतात?

पुढारी ऑनलाईन : ई-मेल, ऑनलाइन पेमेंट, नेटबँकिंग, सोशल मीडिया अॅप इत्यादी गोष्टींचा वापर सध्या अनेक लोक करत आहेत. आपली सर्व माहिती सुरक्षित राहावी म्हणून पासवर्डचा वापर केला जातो. पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. आपल्याला लक्षात राहिल असा पासवर्ड ठेवण्याचा सल्ला सायबर तज्ञ देतात. नुकताच पासवर्ड व्यवस्थापन सेवा देणाऱ्या नॉर्डपासने (NordPass) अलीकडेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पासवर्डची यादी आहे. या यादीमध्ये अशा पासवर्डचा समावेश आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Andhra Pradesh Floods : आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता

नॉर्डपासच्या अहवालानुसार, सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड 123456 आहे. यामध्ये आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे 2020 मध्ये हा पासवर्ड सुमारे 25 लाख 43 हजार वेळा वापरला गेला. तसेच 2021 मध्ये तो 1 कोटीपेक्षा जास्त वेळा वापरला गेला आहे. आपण स्वतःबद्दलच्या डेटाबाबत किती निष्काळजी आहोत हे हा अहवाल सांगतो. आपली संवेदनशील माहिती असलेल्या खात्यांसाठी स्ट्रॉंग पासवर्ड असणे खूप महत्त्वाचे आहे. पण साधारणपणे लोकांकडून लोकप्रिय आणि सोपे असलेले पासवर्ड जास्त वापरले जातात. हे पासवर्ड सुरक्षेच्या दृष्टीने खूपच कमकुवत असतात.

मराठी मालिका : रविवारी आवडत्या मालिकांचे १ तासांचे विशेष भाग

नॉर्डपासच्या या संशोधनानुसार, भारतातील लोक पासवर्डबाबत अजूनही जागरूक नाहीत. भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड हा ‘पासवर्ड’ आहे. भारताव्यतिरिक्त, जपानमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा पासवर्ड देखील ‘पासवर्ड’ आहे. इतर कॉमन पासवर्ड देखील भारतात बिनधास्तपणे वापरले जातात. यामध्ये iloveyou, कृष्णा, omsairam आणि sairam यांचा समावेश आहे. नॉर्डपासच्या संशोधनानुसार, 12345 आणि QWERTY पासवर्ड या यादीत अव्वलस्थानी आहेत. केवळ भारतातच नाही तर जगभरात हे पासवर्ड लोकप्रिय आहेत.

farm laws repeal : ११५ वर्षांत शेतकर्‍यांनी चारवेळा झुकवली दिल्ली!

भारतातील लोकांमध्ये नाव आणि लोकप्रिय शब्द पासवर्ड म्हणून बनवण्याचा ट्रेंड आहे असे या अहवलात नमूद करण्यात आले आहे. भारतातील इतर सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पासवर्ड्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 12345678, 123456789, 123123, abcd1234, qwerty, abc123, india123, indya123, xxx आणि 1qaz यांचा समावेश आहे.

सुरक्षित पासवर्ड ठेवण्याच्या या आहेत सोप्या टिप्स

1. आपला पासवर्ड ठराविक काळाने बदलत राहा.
2. एकच पासवर्ड सर्व अकाऊंटसाठी वापरु नका, बँकिंग पासवर्ड किंवा ट्रेडिंग अकाऊंचा पासवर्ड बनवण्यासाठी अल्फाबेट, नंबर आणि स्पेशल कॅरेक्टरचा उपयोग करावा.
3. जन्मतारीख, आपले नाव, किंवा जवळच्या व्यक्तीचे नाव आणि जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरू नका.
4. तुमचा पासवर्डमध्ये किमान आठ कॅरेक्टर असावेत.

 

Back to top button