नाशिक : कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात | पुढारी

नाशिक : कृषी पर्यवेक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यासाठी मंजूर झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा स्कीम) योजनेंतर्गत दाखल फाइलचे बिल अपलोड करण्यासाठी लाच घेताना कृषी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सुधाकर विश्वनाथ सोनवणे (54) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत मांजरे येथील शेतकऱ्याने तक्रार दिली होती. तर तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना पोकरा योजनेअंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी अनुदान मंजूर झाले होते. या दोघांकडून अधिकाऱ्याने प्रत्येकी एक हजाराची लाचेची मागणी केली होती. त्यानुसार दोन हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यास अटक केली.

हेही वाचा:

Back to top button