ऐकावे ते नवलं… त्‍याने केला उड्या मारत पायांनी मेणबत्ती विझविण्याचा विश्‍वविक्रम | पुढारी

ऐकावे ते नवलं... त्‍याने केला उड्या मारत पायांनी मेणबत्ती विझविण्याचा विश्‍वविक्रम

लंडन : कशाकशाचे विश्वविक्रम होतील हे काही सांगता येत नाही. आता मेणबत्त्या विझविण्याचा विश्वविक्रम झालेला आहे. अर्थात मेणबत्ती विझविणे म्हणजे काही मोठे काम नाही. त्यासाठी काही खास टॅलेंटची गरज नाही. अगदी लहान मूलही ते करू शकते. फुंक मारली किंवा वारा घातला तरी ती विझते!

मात्र एका माणसाने अनोख्या पद्धतीने मेणबत्ती विझविण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. बाटलीत ठेवलेल्या मेणबत्त्या बाटल्यांवरून उड्या मारत दोन्ही पायांची टाळी देत विझविण्याचा हा विक्रम आहे!

गिनिज बुक ऑफ वर्ल्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्यक्तीने सामान्य पद्धतीने नव्हे तर वेगळ्याच पद्धतीने मेणबत्ती विझविली आहे. मेणबत्ती विझविण्याच्या हटके स्टाईलमुळेच तो हा विश्वविक्रम करू शकला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका रांगेत मेणबत्त्या लावलेल्या आहेत. समोर ही व्यक्ती उभी आहे. जी मेणबत्त्या फुंकून किंवा वारा घालून नाही तर जम्प हील क्लिकने मेणबत्त्या विझविल्या. म्हणजे उडी मारत आपली दोन्ही पावले एकमेकांवर आपटून या मेणबत्त्या विझविल्या जात आहेत. अशा तब्बल 55 मेणबत्त्या या व्यक्तीने विझविल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button