Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार | पुढारी

Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २१ गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गंजमाळ येथे झालेल्या दंगली प्रकरणातील १८ गुन्हेगारांचा त्यात समावेश असून, इतर गुन्ह्यांमधील तिघांचा समावेश आहे. दंगलीतील सहभागी दोन्ही टोळ्यांमधील चार सख्ख्या भावांनाही तडीपार केले आहे.

शहरातील गंजमाळ परिसरात काही महिन्यांपूर्वी दोन गटांत हाणामारी झाल्याने परिसरात दंगलसदृश परिस्थिती उद्भवली होती. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून दोन्ही गटांमधील संशयितांची धरपकड केली होती. पोलिस तपासात हा प्रकार संघटित असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. संशयितांमुळे दंगल उसळू शकते, संघटित गुन्हेगारी वाढू शकते. यामुळे संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून भद्रकाली पोलिसांनी वरिष्ठांकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यास पोलीस उपआयुक्तांनी मंजुरी दिल्याने दोन्ही गटांतील १८ संशयितांसह इतर गुन्ह्यांमधील तिघांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये पंचशीलनगर येथील दहा, तर सहकारनगर आणि भीमवाडीतील ८ संशयितांचा समावेश आहे. या १८ जणांना वर्षभरासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तर इतर तिघांपैकी एकास वर्षभर, तर दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

यांना केले तडीपार

अरबाज ऊर्फ सोनू रफीक बेग, शाहरुख फारुख शेख, साहिल फारुख शेख, अक्रम बाबर खान, अरबाज नासिर बागवान, जावेद खुर्शिद शेख, आसिफ रऊफ शेख, शाहिद अयास शेख, राजू अल्ताफ शेख, साहिल ऊर्फ अप्पू अयाज शेख, संदीप गुलाब गाडेकर, गणेश चंद्रकांत मोरे, अनुराग उत्तम सहेजवार, रोहित छबूराव डोके, प्रदीप खंडू वाहुळे, भीमा मुकेश पाथरे, आझाद मुकेश पाथरे, आकाश रमेश सोनवणे, निखील विनोद कंडारे, सादिक हनिफ शेख, पांडुरंग ऊर्फ पांड्या हनुमान शिंगाडे.

हेही वाचा :

Back to top button