हवेत असताना उघडला विमानाचा दरवाजा! | पुढारी

हवेत असताना उघडला विमानाचा दरवाजा!

मॉस्को; वृत्तसंस्था :  रशियामध्ये विमान हवेमध्ये असताना पाठीमागील दरवाजा उघडल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. विमान पुन्हा धावपट्टीवर उतरवून तांत्रिक दोष दुरुस्त केल्यानंतर पुन्हा हे विमान हवेत झेपावले. या सर्व गडबडीमध्ये सुदैवाने प्रवाशांना काही इजा झाली नाही.

रशियन एअरलाईन्सचे एक विमान मागादान या शहरातून जात होते. यामध्ये 6 क्रूमेंबर व 25 प्रवासी होते. जमिनीपासून सुमारे 2,900 मीटर उंचीवर असताना पाठीमागील दरवाजा उघडल्याने प्रवाशांचे साहित्य हवेच्या प्रचंड झोतामुळे विस्कटले. प्रवाशांना आपला जीव धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वत्र एकच घबराट पसरली. वैमानिकाने लगेच विमान सुरक्षितपणे जवळ असलेल्या धावपट्टीवर उतरवले. दरवाजा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा हे विमान प्रवासासाठी रवाना झाले. या घटनेचे एका प्रवाशाने व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. त्यामुळे हा प्रकार किती भीतीदायक होता हे लक्षात येते.

Back to top button