चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू | पुढारी

चांदवड : ट्रॅक्टर खाली दबल्याने चालकाचा मृत्यू

चांदवड :  पुढारी वृत्तसेवा

भरधाव ट्रक्टर घेऊन जाणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर नाल्यात जाऊन पलटी झाल्याने ट्रक्टरचालक ट्रॅक्टरखाली दबला गेला. या दुर्घटनेत चालकाच्या डोक्यास गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून चांदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे कि, मुळचा देवळा तालुक्यातील चिंचवे येथील व सध्या दुगाव (चांदवड) येथे वास्तव्यास असलेला एकनाथ शामराव पगारे (३२) हा गंगावे गावाच्या शिवारातील रस्त्याने ट्रॅक्टर घेऊन जात होता. ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने वाहन एकनाथ हा लहानू शांताराम नरोटे यांच्या शेताजवळील नाल्यात जाऊन पलटी झाले. या दुर्घटनेत ट्रॅक्टरचालक एकनाथ हा ट्रॅक्टरखाली दबल्याने  त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यास नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याबाबत शंकर विठ्ठल ऐळीजे (५२) यांच्या फिर्यादीवरुन चांदवड पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button