कोल्हापूर : कुरुंदवाड येथे दुर्गा माता दौडीचे ९ वे पुष्प संपन्न | पुढारी

कोल्हापूर : कुरुंदवाड येथे दुर्गा माता दौडीचे ९ वे पुष्प संपन्न

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रभक्ती-धर्मभक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्याचे बळ आणि अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त, बनवण्यासाठी दुर्गामाता दौड प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मंदार पाटुकले यांनी केले. कुरुंदवाड येथे नवरात्रोत्सवानिमित्त छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीतर्फे दुर्गामाता दौड नऊ दिवसाचे पुष्प बुधवारी संपन्न झाले. शिवतीर्थ येथे स.पो.नि बालाजी भांगे,उपनिरीक्षक अमित पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते आरती करून प्रेरणामंत्र, ध्येयमंत्र पठनानंतर मंदार पाटूकले यांचे मार्गदर्शन झाले.

दौड पथकातील युवती आणि दौडीतील सहभागी तरुणांचे महिलांनी रांगोळी काढून आणि आरती करून फटाक्याची आतषबाजी करून स्वागत केले. दौडीत देशभक्तीपर गीते, पोवाडे म्हणण्यात आले, तर राष्ट्राभिमान जागवणार्‍या घोषणा देण्यात आल्या. शहरातील शिवतीर्थ नवबाग रस्ता,सन्मित्र चौक, गवळी गल्ली, गोठणपूर व बाजारपेठ ते पुन्हा शिवतीर्थ या मार्गावरून दौड निघाली होती.महिलांनी ठिकठिकाणी ध्वजाचे औक्षण करून स्वागत केले. नागरिकांनी पुष्पवृष्टी करून दौडीचे स्वागत केले. छत्रपती संभाजी महाराज बलिदान समितीचे नितीश आंबी, गौतम पाटील,अमृत चोपडे,दिलीप पटेल,सह युवक,युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button