नाशिक : ‘एनडीएसटी’कडून मृत सभासदाच्या वारसांना 25 लाखांचा धनादेश | पुढारी

नाशिक : ‘एनडीएसटी’कडून मृत सभासदाच्या वारसांना 25 लाखांचा धनादेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीने नुकतेच अपघाती निधन झालेल्या सभासदाच्या वारसांना अपघाती विमा योजनेंतर्गत 25 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. उपनगर येथील श्री. भा. वि. जोशी महाराष्ट्र हायस्कूलमधील कनिष्ठ लिपीक भरत खेलूकर यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. खेलूकर हे सभासद असल्याने एनडीएसटी सोसायटीने त्यांच्या कुटुंबीयांकडे संस्थेच्या अपघाती विमा योजनेचा 25 लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब ढोबळे, कार्यवाह छोटू शिरसाट, ज्येष्ठ संचालक संजय चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक घरटे आदींसह सहकारी शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button