धुळे : बोराडी गावातून १ लाख ७० हजारांचा मद्याचा साठा जप्त | पुढारी

धुळे : बोराडी गावातून १ लाख ७० हजारांचा मद्याचा साठा जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा: शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी गावात दारुची तस्करी करणाऱ्या एकास अटक करण्यात आली आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे एक लाख ७० हजार रुपये किमतीची मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे .

शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेशाच्या सीमालगत असणाऱ्या न्यू बोराडी परिसरात मद्याचा मोठा साठा आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही माहिती पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांना दिली. या माहितीची खात्री केली असता त्यांना बोराडी गावात सुरेश गजला पावरा याच्या ताब्यात मद्याचा मोठा साठा असल्याचे समजले. त्यानुसार छाप्याचे नियोजन करण्यात आले.

यानंतर पोलीस पथकाने सुरेश पावरा याच्या झोपडीजवळ छापा टाकला असता या झोपडी जवळून सुमारे एक लाख ७० हजार रुपये किमतीचे टॅंगो पंच मद्याचे ५९ बॉक्स आढळून आले आहे. दरम्यान सुरेश गजला पावरा याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा मद्याचा साठा पाठवणाऱ्या तस्कराचा शोध पोलीस पथकाने सुरू केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button