गडचिरोली : नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील जाळली सहा वाहने | पुढारी

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील जाळली सहा वाहने

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलिस मदत केंद्रांतर्गत विसामुंडी येथील निर्माणाधीन रस्त्याच्या बांधकामावरील सहा वाहने आणि दोन मिक्सर मशीनची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विसामुंडी येथे रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र, काल बुधवारी (दि.२९) रोजी मध्यरात्री सशस्त्र नक्षलवादी बांधकामस्थळी गेले. त्यांनी कामावरील मजुरांना झोपेतून उठवून मारहाण केली आणि एक पोकलेन, एक जेसीबी, दोन, ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकलींना आग लावली. शिवाय दोन मिक्सर मशीनही जाळून टाकल्या.

हेही वाचलंत का?

Back to top button