कार्ला : वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांना अरेरावी | पुढारी

कार्ला : वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांना अरेरावी

कार्ला : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर असणारे कर्मचारी स्थानिकांना अरेरावी करत हुज्जत घालतात असे प्रकार वारंवार होत असल्याने याच्या विरोधात मावळ तालुका शिवसेनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळ व वरसोली टोलनाका व्यवस्थपनाला निवेदन देण्यात आले.

टोलनाक्यावर स्थानिकना टोल मधुन सवलत असताना गाडी सोडत नाही व विनाकारण हुज्जत घालून भांडण करत त्रास दिला जातो. लोणावळा खंडाळा व कार्ला परिसरात पर्यटन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शनिवारी रविवारी टोलनाक्यावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत लांब रांगा लागतात अशावेळी स्थानिकांना वेगळी लेन असवी अशी मागणी देखील यावेळी निवेदन देऊन करण्यात आली.

तसेच प्रवास करणार्‍या वाहनचालकांंना टोल वर शुलभ शौचालय नाही यामुळे भौतिक सुखसुविधा पुरवण्याची मागणी देखील केली आहे. आपले कर्मचारी टोल वर भांडण किंवा अरे रावी आपल्या कर्मचारी वर्गाकडून होत आहे.आपण मावळ च्या नागरिकांसाठी आहात हें विसरू नये. या बाबत आपण वेळेच दक्षता नाही घेतली तर मावळ शिवसेना च्या वतीने टोलनाक्यावर वर तिव्र आंदोलन करण्यात येईल किंवा वेळ प्रसंगी टोल बंद करण्यात येईल असा इशारा देखी मावळ शिवसेनेच्या वतिने देण्यात आला आहे.

यावेळी मावळ तालुका शिवसेना प्रमुख राजेश खांडभोर,लोणावळा शहर प्रमुख बाळासाहेब फाटक,मावळ युवासेना प्रमुख विजय तिकोणे, माजी उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, अशिष ठोंबरे, अनिल ओव्हाळ,दत्ता केदारी,संतोष गिरी,मंगेश येवले यांंच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

Back to top button