बारामती : पालखी सोहळ्यात 16 जणांना कोरोना | पुढारी

बारामती : पालखी सोहळ्यात 16 जणांना कोरोना

बारामती : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांची बारामतीत मंगळवारी व बुधवारी रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. दोन दिवसांत मिळून 16 जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. बाधितांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे तालुका आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

बाधितांत बारामती परिसरातील कोणाचाही समावेश नाही. आरोग्य विभागाच्या वतीने उंडवडी येथे घेतलेल्या तपासणीत एकही जण कोविड पॉझिटिव्ह आढळला नव्हता. मात्र, बारामतीत चार, तर काटेवाडीत 12 जण पॉझिटिव्ह आढळून आले. सोहळ्यात काही वारकर्‍यांना लसीकरण केले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.

Back to top button