जळगाव : झोका तुटल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू | पुढारी

जळगाव : झोका तुटल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
एरंडोल तालुक्यात साडीच्या झोक्यातून पडल्याने दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला आहे. यात दोन बहिणी जखमीदेखील झाल्या असून, त्यांच्यावर जळगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अर्चना धनसिंग पावरा (वय दीड वर्ष) असे मृत बालिकेचे नाव आहे. सावदे येथील जयसिंग हे पत्नीसोबत शेतात काम करतात. त्यांची सासू व तीन मुली घरी होत्या. यावेळी विटांच्या घरावर लोखंडी पाइपला साडीच्या झोक्यात तीनही मुली खेळताना झोका तुटला व विटा मुलींच्या अंगावर पडल्याने अर्चनाचा मृत्यू झाला. अन्य साडेतीन वर्षे व पाच वर्षाच्या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

हेही वाचा ;

Back to top button