पुण्यात आजपासून सलग पाच दिवस पावसाचे! | पुढारी

पुण्यात आजपासून सलग पाच दिवस पावसाचे!

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. मात्र, आज पासून सलग पाच दिवस चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 20 ते 25 जूनपर्यंत शहरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

जून महिन्यात शहरात सरासरी 86 मिमी पाऊस पडतो, परंतु गेल्या पंचवीस वर्षांत किमान तेरा वेळा ही सरासरी 100 ते 200 मिमीवर होते. 26 जून 1961 मध्ये शहरात सर्वाधिक 131 मिमी पावसाची नोंद 24 तासांत झाल्याचा विक्रम आहे. त्यामुळे यंदा शहरात 20 जूनपर्यंत फक्त 28 मिलिमिटर इतका कमी पाऊस झाला आहे.

अजून 40 ते 50 मिमी पाऊस पडला तर जूनची किमान सरासरी गाठली जाईल. उद्या 20 रोजी शहरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर 21 जून रोजी शहराला येलो अ‍ॅलर्टचा इशारा दिल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 जूनपर्यंत शहरात ढगाळ वातावरण राहून हलका ते मध्यम पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

हेही वाचा

Konkan : राजापूर तालुक्याचा दहावीचा निकाल 98.94 टक्के

पावसाने ओढ दिल्याने पेरणी उशिरा होणार

ई-बाईक गेल्या कुणीकडे; मेट्रो स्थानकांवरील ई-बाईक गायब झाल्याने पुणेकरांचा सवाल

Back to top button