सातारा : जोतिबा दिंडीचे आज प्रस्थान | पुढारी

सातारा : जोतिबा दिंडीचे आज प्रस्थान

सातारा : पुढारी वृत्तसेवा
पाडळी (निनाम), ता. सातारा येथील श्री जोतिबा प्रासादिक दिंडीचे सालाबादप्रमाणे रविवारी गावातून प्रदक्षिणा व साहित्य पूजन कार्यक्रम करुन सोमवार, दि. 20 रोजी सकाळी देहूकडे आषाढी पायी वारीसाठी प्रस्थान होणार आहे.
श्री जोतिबा दिंडीचे हे 11 वे वर्ष असून, या दिंडीचा 95 क्रमांक आहे. या दिंडीच्या पायी वारीमध्ये 150 ते 200 वारकरी यांचा समावेश आहे.

या दिंडीत पाडळी, निनाम, डोळेगाव, मांडवे, कामथी, नांदेड, तासगाव, नागठाणे, लिंब, कोंडवली, जांबळेवाडी, आमनापूर, जुळेवाडी, कोकराळे, शिरगाव, बनेवाडी, धनगाव, मोळावडे, शिरढोण, डबेवाड, साळवण, जांब, कुमठे, कळंबे गावातील वारकर्‍यांचा सहभाग आहे. दिंडी मालक ह.भ.प. अरुण महाराज पाडळीकर आहेत. अ‍ॅड. जोतिराम ढाणे (मामा) हे संयोजक आहेत.

Back to top button