नाशिक (सिडको) : त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश | पुढारी

नाशिक (सिडको) : त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याचे आदेश

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडको विभागातील त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स हा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अतिशय रहदारीचा रस्ता असल्याने पावसाळ्यापूर्वी काम होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र काही बड्या व्यक्तींचे अतिक्रमण मनपाच्या आधिका-यांनी संगनमत करून न हटविल्याने या विकास कामाला विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. मनपा आयुक्त रमेश पवार यांनी रस्त्याची पाहणी करीत अतिक्रमण हटवून काम सुरू करण्याचे आदेश दिले.

अंबड औद्योगिक वसाहतीला जोडला जाणारा मुख्य रस्ता म्हणून त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स चा रस्ता ओळखला जातो. हा रस्ता रुंदीकरण होऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी होती. हाच संदर्भ लक्षात घेऊन नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी पाठपुरावा करीत करोडो रुपयांची मंजुरी मिळवत रस्ता रुंदीकरणास सुरवात केली. या रस्त्याच्या विकास कामात येणारे अनेक अतिक्रमणे हटविण्यात आली. काही बड्या राजकीय व सामजिक नेत्यांच्या असलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालविण्यास दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे एकीकडे रस्ता रुंदीकरण होत असताना दुसरीकडे असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्यांचे काम रखडले होते.

याबाबत मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सर्व आधिका-यांचा फौजफाटा घेऊन पाहणी दौरा केला. यावेळी सर्व अतिक्रमणे तत्काळ हटवून काम सुरू करण्याचे आदेश दिले. या कामाबाबत माजी नगरसेवक तथा सेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

Back to top button