मनीष सिसोदियांच्या जामीनावर १३ मे रोजी सुनावणी | पुढारी

मनीष सिसोदियांच्या जामीनावर १३ मे रोजी सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : मनीष सिसोदिया यांच्या जामीनावर दिल्ली उच्च न्यायालयात १३ मे रोजी सुनावणी होणार आहे. सिसोदियांच्या जामीन याचिकेप्रकरणी ईडी आणि सीबीआयने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (८ मे) सुनावणी झाली. यावेळी ईडी आणि सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी मागितला. मात्र न्यायालयाने केवळ ४ दिवसांची मुदत दिली. त्यामुळे याप्रकरणी १३ मे रोजी सुनावणी होणार आहे.

बुधवारी सुनावणीदरम्यान मनीष सिसोदिया यांचे वकील विवेक जैन यांनी अतिरिक्त वेळ देण्याच्या मागणीला विरोध केला. जैन म्हणाले की, “सिसोदिया न्यायालयीन कोठडीत आहेत आणि ईडीने सर्वोच्च न्यायालयाला ६ महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतू तसे होत नाही.”

दरम्यान, मंगळवारी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने १५ मे पर्यंत वाढ केली आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

Back to top button