IPL 2024 : षटकारांचा पाऊस! IPL 2024 मध्ये 1000 षटकार पूर्ण | पुढारी

IPL 2024 : षटकारांचा पाऊस! IPL 2024 मध्ये 1000 षटकार पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 मध्ये नवा पराक्रम घडला आहे. आयपीएलच्या इतिहासात तिस-यांदा एका हंगामात 1000 षटकार ठोकले गेले आहेत. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी अवघ्या 13079 चेंडूंमध्ये नोंदवली गेली. लखनऊचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्याने आयपीएल 1000 वा षटकार ठोकला. हा या हंगामातील 57 वा सामना होता.

क्रुणालने हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर 21 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीनं 24 धावांची खेळी केली. तो 12व्या षटकात धावबाद झाला. क्रुणालने जयदेव उनाडकटच्या आठव्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकून आयपीएल 2024 मधील 1000 षटकार पूर्ण केले.

आयपीएलच्या इतिहासातील केवळ तिस-याच हंगामात 1000 किंवा त्याहून अधिक षटकार मारले गेले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 70 पेक्षा कमी सामन्यांमध्ये आणि 15000 पेक्षा कमी चेंडूंमध्ये 1000 षटकारांचा आकडा गाठला गेला आहे. आयपीएल 2022 मध्ये 74 सामने आणि 16269 चेंडूंमध्ये 1000 षटकार मारले गेले होते. तर आयपीएल 2023 मध्ये 74 सामने आणि 15390 चेंडूंमध्ये इतके षटकार लगावण्यात आले होते. आयपीएलच्या चालू हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू केकेआरचा सुनील नारायण आहे. त्यानं आतापर्यंत 32 षटकार मारले आहेत.

आयपीएलच्या एका हंगामात 1000 षटकार

आयपीएल 2024 – 13079 चेंडू
आयपीएल 2023 – 15390 चेंडू
आयपीएल 2022 – 16269 चेंडू

 

Back to top button