धुळे : मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला | पुढारी

धुळे : मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला

पिंपळनेर, ता. साक्री : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील मैंदाने ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत मैंदानेचे सरपंच व शिवसेना उपतालुका प्रमुख कैलास ठाकरे यांच्या पॅनलचे भाईदास भारडे, धनाबाई भारडे असे तीनपैकी दोन जागांवर भरघोस मतांनी निवडून आले.

यावेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साक्री येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात विजयी ग्रामपंचायत सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या नावाचा जयघोष केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अप्पा वाघ, पिंपळनेर तालुका प्रमुख, सरपंच हिम्मत साबळे, कैलास ठाकरे यांच्या हस्ते नियुक्त ग्रामपंचायत सदस्य भाईदास भारूडे व धनाबाई भारूडे यांचा सत्कार केला. त्यांनी सर्व मैंदाने गावातील जनतेचे व मतदार दात्यांचे आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button